मुंबई: वेब सीरीज तांडववरून (Tandav) सुरू असलेला वाद थांबताना दिसत नाही. मुंबईतील अॅमेझॉनच्या (Amazon) कार्यालयात जाऊन ५ तासांहून अधिक वेळ मिंटिंग घेऊन दबाव टाकावा लागला. त्यानंतर अॅमेझॉनला माफी मागावी लागली आहे. मात्र आता केवळ माफीने काम चालणार नाही, त्या सर्वांना आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपचे आमदार आणि प्रवक्ता (Ram Kadam) यांनी म्हटले आहे. ( says and we will send all these to jail)

यापूर्वी भाजपचे आमदार आणि प्रवक्ता राम कदम यांनी मुंबईतील अॅमेझॉनच्या कार्यालयात जात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अॅमेझॉनने माफी मागावी आणि वेब सीरीजचे पोस्टर्स काढून टाकावेत अशी मागणी राम कदम यांनी बैठकीत केली. मात्र अॅमेझॉनकडून त्यावर कोणतेही सकारात्मक उत्तर देण्यात आले नाही.

‘अॅमेझॉनकडून कोणतेही सामान खरेदी करू नका’

देशातील जनतेने अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवरून कोणतेही सामान खरेदी करू नये, असे आवाहन राम कदम यांनी देशातील जनतेला केले आहे. वेब सीरीजद्वारे हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जो पर्यंत अॅमेझॉनचे अधिकारी संपू्र्ण हिंदू समाजाची माफी मागत नाही, तो पर्यंत अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये, असे कदम यांचे आवाहन आहे. इतकेच नाही, तर हिंदू समाजाच्या शक्तीचा अंदाज यावा या उद्देशाने अॅमेझॉन अॅप देखील मोबाइल फोनमधून डिलिट करावे, असे आवाहनही कदम यांनी केले आहे.

वादावर केंद्र सरकारने मागितले स्पष्टीकरण
वेब सीरीजबाबत केंद्र सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अॅमेझॉन प्राइमच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. त्यांना या वादावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

सीरीजबाबत काय वाद आहे?
वेब सीरीज तांडवमध्ये भगवान शीवबाबत काही टिप्पणी करण्यात आली असल्याचा आरोप आहे. तांडवमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशु धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, मोहम्मद जीशान अयूब, गौहर थान आणि तृतिका कामरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अली अब्बास जफरने या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे. तर याची पटकथा ‘आर्टिकल १५’ फेम गौरव सोलंकी यांची आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here