कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती झीज झालेली नसून ती अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. यामुळे या मूर्तीला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील पश्चिम क्षेत्र उप अधीक्षक (रसायनतज्ञ) यांनी दिला आहे. दरम्यान, मंदिरातील श्री व श्री महास्वरस्वती मूर्तींची झीज झाली असून त्यांचे रासायनिक जतन प्रक्रिया (केमिकल कंन्झर्व्हेशन) करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ( )

वाचा:

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने २०१५ मध्ये अंबाबाई मूर्तीचे रासायनिक संवर्धन केले होते. आता या विभागाने पुन्हा मूर्तीची पाहणी केली व त्या पाहणीनंतर सुस्थितीत असून केवळ देवीच्या चरणालगत थोडी झीज असून लवकरच याचे रासायनिक संवर्धन केले जाईल असे सांगितले. श्रीकांत मिश्रा यांच्यासह केंद्रिय पुरातत्व विभागाचे सुधीर वाघ, विलास वाहणे, सहाय्यक संचालक उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, वास्तू विशारद अमरजा निंबाळकर, उमाकांत राणिंगा यांनी मूर्तीची पाहणी केली. सर्व पाहणी केल्यानंतर अंबाबाईच्या मूर्तीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.

वाचा:

मंदिरात काही प्रमाणात कार्बनचा थर बसल्याचे दिसत आहे. तो काढून संपूर्ण स्वच्छ करून घेणे आवश्यक असल्याचे पुणे येथील सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी स्पष्ट केले. हा थर टप्प्याटप्प्याने काढून घेऊन मंदिराची इतर दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिराच्या टेरेसवर मोठया प्रमाणात असलेला कोब्याच्या थराची पाहणीही करण्यात आली. हे थर काढण्याचे काम फार अवघड व जोखीमीचे आहे. हा कोबा मंदिराच्या स्ट्रक्चरचा एक भाग बनला आहे. त्यामुळे या संदर्भात आणखी सखोल अभ्यास करून आवश्यक तपासण्या करून त्यानंतर दुरुस्ती करणे योग्य होईल, असे वाहणे यांनी सूचविले. मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाची पाहणी करून हे काम अत्यंत काळजीपूर्वक करावे अशा सूचना देण्यात आल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here