नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांना सोमनाथ मंदिर ( ) ट्रस्टचे अध्यक्ष करण्यात आले आहे. ‘सोमनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी विश्वस्तांच्या डिजिटल बैठकीत नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली’, अशी माहिती ट्रस्टचे सचिव पी. के. लाहेरी यांनी दिली.

पंतप्रधानांना ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय सर्व विश्वस्तांनी ऑनलाइन बैठकीत एकमताने घेतला. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातमधील तज्ज्ञ जे. डी. परमार आणि उद्योगपती हर्षवर्धन निओतिया, हे ट्रस्टचे इतर सदस्य आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्या निधनानंतर सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.

सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष झाल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी यांचे अभिनंदन केले. सोमनाथ मंदिर परिसराच्या विकासासाठी मोदींनी केलेलं समर्पण हे विशेष आहे आणि मोदींच्या अध्यक्षतेखाली ट्रस्ट सोमनाथ मंदिराची प्रतिष्ठा आणखी वाढवेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here