म. टा. वृत्तसेवा, ठाणे

ठाण्यामध्ये सोमवारी दुपारी खारकर आळीतील एका औषधांच्या दुकानात शिरला. घाबरलेल्या नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला. अखेर वन कर्मचारी आणि प्राणीमित्र संस्थांचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत या कोल्ह्याला पकडले. जखमी अवस्थेत असलेल्या या कोल्ह्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली आहे.

आणि खाडी किनारी झालेल्या अतिक्रमणांमुळे जैवसाखळी धोक्यात आली आहे. खाडीमध्ये टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे कांदळवनातील काही वन्यजीव अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करू लागले आहेत. सोमवारी खारकर आळीतील श्री मेडिकल जेनेरिक फार्मसी या औषधांच्या दुकानात हा कोल्हा (गोल्डन जॅकल) शिरल्याने खळबळ माजली. येथून ठाणे खाडी जेमतेम ५०० मीटर अंतरावर आहे. ‘सावजाच्या शोधात तो भरकटून येथे आला असावा. भरकटलेल्या या कोल्ह्याच्या मागे कुत्रे लागले होते. आपला जीव वाचवण्यासाठी लपायला जागा शोधताना तो या दुकानात आला असावा,’ असे प्राणिप्रेमींनी सांगितले.

वाइल्ड लाइफ, वेल्फेअर असोसिएट या प्राणी संस्थेचे कार्यकर्ते आणि वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल संजय पवार, संदीप मोरे, दत्तात्रेय पवार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याच्या पायाला जखम झाली आहे. त्याला पुढील उपचारांसाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये नेण्यात आले आहे. हे कोल्हे मुंबई, ठाणे, वसई, उरण परिसरातील खाडीजवळ आढळतात. या कोल्ह्यांची उंची साधारण दोन ते अडीच फूट असून लांबी तीन ते साडेतीन फूट असते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here