ब्रिस्बेन: aus vs ind 4th testऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा युवा फलंदाज ()ने सर्वांचे मन जिंकले. ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी गिलचे शतक हुकले. तो ९१ धावांवर बाद झाला. पण भारतीय संघासाठी त्याने महत्त्वाची खेळी केली.

वाचा-

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या गिलने २५९ धावा केल्या आहे. मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत गिल अव्वल स्थानावर आहे. उत्तम फलंदाजीचे तंत्र असलेल्या गिलने पहिल्याच दौऱ्यात सर्वांचे मन जिकले आहे. पाचव्या दिवशी रोहित शर्मा सात धावांवर बाद झाल्यानंतर पुजाराने विकेट पडू दिली नाही. पण दुसऱ्या बाजूला गिलने धावांचा वेग वाढवला आणि भारतीय संघात विजयाची आशा निर्माण केली.

वाचा-

वाचा-

शुभमनच्या विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सातत्याने शॉर्ट पिच चेंडू टाकले. पण गिलने त्यावर आक्रमक शॉट खेळले. ९१ धावांच्या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीत गिलच्या नावावर एक नवा विक्रम जमा आला आहे. भारताकडून चौथ्या डावात सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम गिलच्या नावावर जमा झाला आहे. त्याच बरोबर सर्वात कमी वयात ९० हून अधिक धावा गिलने केल्या आहेत. याबाबत त्याने दिग्गज फलंदाज सुनिल गावस्कर यांना टाकले. गिलने २१ वर्ष १३३ दिवशी कसोटीतील चौथ्या डावात अर्धशतक केले. हा विक्रम आतापर्यंत सुनिल गावस्कर यांच्या नावावर होता. त्यांनी १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या डावात नाबाद ६७ धावा केल्या होत्या.

मेलबर्न मैदानावर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात गेलने ४५ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात नाबाद ३५ धावा केल्या. त्यानंतर सिडनी कसोटीत पहिले अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात ५० तर दुसऱ्या डावात ३१ धावा केल्या होत्या.

१९ वर्षाखालील संघात केली होती कमाल

भारतीय संघात निवड होण्याआधी गिलची १९ वर्षाखालील वर्ल्डकप संघात निवड झाली होती. तेव्हा इंग्लंडमध्ये त्याने चार डावात ३५१ धावा केल्या होत्या. वर्ल्डकपनंतर इंग्लंड दौऱ्यात चार डावात २७८ धावा केल्या होत्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here