मुंबई: राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मागील आठवड्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. गृहमंत्री , सामाजिक न्यायमंत्री यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम राखलं आहे. बलात्काराच्या आरोपांमुळं सध्या अडचणीत आलेले मुंडे यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा:

बीडमधील विधानसभा मतदारसंघातील १२ पैकी १० ग्रामपंचायतीवर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. याबद्दल मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा,’ असं म्हणत, निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयानंतर जल्लोष करणाऱ्या, गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांचे फोटोही त्यांनी ट्वीट केले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चुलत बहीण यांचा पराभव करत धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघ खेचून आणला होता. मुंडे बंधू-भगिनींमधील राजकीय स्पर्धेमुळं परळीतील प्रत्येक निवडणूक नेहमीच चुरशीची आणि चर्चेचा विषय ठरते. आताची ग्रामपंचायत निवडणूकही त्यास अपवाद नव्हती. मात्र, धनंजय मुंडे यांनी त्यात वर्चस्व राखलं आहे.

वाचा:

रेणू शर्मा नामक महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळं धनंजय मुंडे सध्या वादात सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाकडून सरकारवर दबाव टाकला जात आहे. तूर्त त्यांचे मंत्रिपद वाचले असले तरी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीत समर्थकांनी मिळवलेला विजय मुंडेंसाठी दिलासादायक मानला जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here