औरंगाबादः २५ वर्षांपासून पाटोदा गावचे सरपंच असणारे भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीला यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनुराधा पेरे यांच्या पराभवानंतर भास्करराव पेरे पाटील यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

१६ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. निकाल स्पष्ट झाल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींचे निकाल धक्कादायक आले होते. त्यातीलच एक ग्रामपंचायत म्हणजे पाटोदा गाव. पाटोदा हे गाव आदर्श गाव म्हणून राज्यात परिचीत आहे तसंच, या गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची आदर्श सरपंच म्हणून ओळख आहे. असं असतानाही भास्करराव पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव झाला आहे. या निकालानंतर भास्करराव पेरे पाटील यांनी मात्र या देशानं इंदिरा गांधींसारख्या नेत्यांचाही पराभव पाहिला आहे, असं म्हणत निकाल स्वीकारला आहे.

‘मुलीची इच्छा होती म्हणून ती निवडणुकीला उभी राहिली. १० ते १२ मतांनी तिचा पराभव झाला आहे. त्यात काही विशेष नाही. त्याउलट तिला शिकायला मिळालं, असं भास्कररावर पेरे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, ‘२५ वर्षांपूर्वी मी जेव्हा निवडणुकीला उभं राहिलो होतो तेव्हा सुरुवातीला माझा पराभव झाला होता. इंदिरा गांधींसारखे नेते ही पराभूत होतात. आपल्या देशातील मतदाता आहे त्यांला मानलंच पाहिजे,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.

‘गावात कोण जिंकून आलं हे महत्त्वाच आहे. तो जिंकून आल्यानंतर काय करतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे कोण जिंकलं यांचीच जास्त चर्चा होते,’ असंही पाटील यांनी म्हटलं आहे. गावात सत्तांतर झाल्यानंतरच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. ‘गावातील लोकं सुशिक्षित आहेत. गावाला घेऊन चालणारे अनेक लोकं आहेत. ते गावाला वाऱ्यावर सोडणार नाहीत. विकासाचं काम सुरुच राहणार आहे. हे गाव आहे गावातील राजकारण वेगळं असतं. आपण कोणाला मतदान करावं याची ज्याची त्याची समज असते,’ असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर भास्करराव पेरे पाटील मार्गदर्शक म्हणून काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विकासाच्या बाबतीत कोणी विचारायलं आलं की त्याला मदत करणार आणि माहिती देणार. गावातल्याच नाही तर राज्यभरातून कोणी मदत मागितली तरी मदत करणार. त्यासाठी मी नवीन कार्यालयही सुरु केलं आहे’ एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here