मुंबईः आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच सुमारे सहा हजार ग्रामपंचायची जिंकल्या आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ते यांनी केला आहे.

१६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतींचे निकाल आता स्पष्ट होतायेत. यावेळी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरशी झाल्याचं दिसताच भाजपनंही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत आकडेवारी सादर केली आहे.

‘राज्यातील १६०० बिनविरोध ग्रामपंचायतींपैकी आम्ही ५८० ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही ६ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते अनेक पॅनलमधून उभे होते. त्यातून ते निवडून आले. आम्ही कोणाच्याही विजयावर दावा करत नाही. आमचे कार्यकर्ते किती निवडून आले, त्यावरुन दावा करतोय. आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो,’ असं केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केलं आहे.

‘गडचिरोली आणि इतर ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी असून त्यातही भाजपला यश मिळणार आहे. प्रत्येक पक्षानं आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आम्हीच कसे मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाला कितीही दावा करुदेत माझ्या हातात आकडेवारी आहे,’ असंही ते म्हणाले आहेत.

काँग्रेसनं ४ हजार जागा जिंकल्याचा दावा केला आहे. त्यावरही उपाध्ये यांनी टिप्पणी केली आहे. ‘काँग्रेसनं केलेला दावा सत्ताधारी पक्ष तरी मान्य करतील का. काँग्रेस कायम चौथ्या नंबरवर आहे. विधानसभा, लोकसभा निकाल आल्यानंतरही काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. आताही काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. पण काँग्रेसला राज्यातील दोन पक्ष तरी विचारतात का याचा विचार त्यांनी करावा,’ असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here