नाशिक: नाशिकरोडच्या दूषित पाणीप्रश्नावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी ऑनलाइन महासभेत प्रवेश करून प्रचंड राडा केला. शिवसेनेचे नगरसेवक पीठासनावर धावून जात राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना आणि भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले. त्यामुळे महासभेत अभूतपूर्व गोंधळ होऊन महापौर सतीश कुलकर्णी यांना महासभा तहकूब करावी लागली.

वाचा:

नाशिकरोडमधील काही प्रभागात दारणा पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा केला जातो, परंतु याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी ऑनलाइन महासभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नगरसेवकांनी ऑनलाइन महासभेत घुसून महापौरांना दूषित पाण्याबाबत जाब विचारला. प्रशासनाकडून उत्तरे मिळत नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावरून सभागृहात प्रचंड आरडाओरड सुरू झाली. राजदंड पळवण्यावरून भाजप-सेनेचे नगरसेवक एकमेकांना भिडले. सभागृहात शिवसेना-भाजप नगरसेवकानी एकमेकांवर आरोप सुरू केले. भाजप नगरसेवकांनी ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले. हा वाद अधिकच चिघळला. पुन्हा राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाल्याने सभागृहात प्रचंड रेटारेटी सुरू झाली. अखेर महापौरांनी महासभा तहकूब केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here