मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेले तरी या नव्या समीकरणाची चर्चा थांबताना दिसत नाही. भाजपचे नेते अद्यापही या धक्क्यातून बाहेर आले नसल्याचं चित्र आहे. माजी खासदार यांनी आज केलेल्या या ट्वीटवरून पुन्हा एकदा हे दिसून आलं आहे.

आकाराला येत असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी घेतलेल्या शपथविधीमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. फडणवीस-पवारांचं हे सरकार अवघं ८० तास टिकलं. अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन होऊन यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का होता. त्यामुळंच अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी व महाविकास आघाडी हा राज्याच्या राजकारणातील ‘एव्हर ग्रीन’ विषय ठरला आहे. दोन्ही बाजूकडील नेते यावर आजही मतं मांडताना दिसतात. भाजपचे नेते महाविकास आघाडीवर सातत्यानं दुगाण्या झाडत असतात.

वाचा:

ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ही टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘गद्दारी करून ठाकरे सरकारमध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांना सुरुवातीला यश मिळतं पण त्यांचा अंत वाईट असतो. स्वतःला मोठे जाणते म्हणवून घेणारे आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही,’ असं भाकितही नीलेश राणे यांनी वर्तवलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here