पुणे: केंद्रीय सचिवांच्या नावाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करून मेट्रोचे कंत्राट मिळवून देण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी व कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोनही अधिकाऱ्यांना फोन करणारी व्यक्ती एकच असण्याची शक्यता आहे.

वाचा:

याबाबत पीएमआरडीएचे प्रमुख सुहास दिवशे (रा. पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमआरडीएकडून शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे काम केले जात आहे. १६ जानेवारी रोजी दिवसे हे घरी असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने केंद्रीय ग्रामविकास खात्याचे सचिव डी. एस. मिश्रा असल्याची बतावणी केली. दिवसे यांना मेट्रोच्या ठेकेरादारांची माहिती विचारून त्यांना फोन करण्यास सांगितले. मेट्रोचे ठेकेदार गुप्ता यांच्याकडून आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने त्यांना सतत फोन केले. त्यांना हा संशयास्पद प्रकार वाटल्यानंतर त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांना हा सर्व फसवेगिरी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात स्वतः जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी सहायक निरीक्षक राजेंद्र दहिफळे हे अधिक तपास करत आहेत.

वाचा:

दुसऱ्या घटनेत महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनचे लि. कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे (वय ५२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना देखील अशाच पद्धतीने मिश्रा यांच्या नावाने फोन करून ठेकेदारांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस अधिक तपास करत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here