साताराः ‘शहरातील पोवई नाका परिसरातील मागील पावणेतीन वर्ष अव्याहत सुरू असलेले ग्रेड सेपरेटर चे काम पूर्णत्वाला जाऊन त्याचे उद्घाटन आम्ही केले आता ग्रेट सेपरेटरच्या भूमिपूजनासाठी जे आले नाहीत ते उद्घाटनाला ही वेळ काढणार नाहीत हे माहीत होते. त्यामुळे लोकांचा कौल घेऊनच आम्ही ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले आहे. आता उद्घाटन झाले ते झालेच. एकदा मूल जन्माला आल्यावर ते पोटात घालून पुन्हा कसे काय सिझेरियन करतात हे कळत नाही,’ असा घणाघाती टोला भाजपचे खासदार यांनी लगावला आहे.

सातारा जिल्ह्याला मंजूर झालेले मेडिकल कॉलेज, कास धरणाची उंची वाढविणे ,शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आणि ग्रेड सेपरेटची सुरक्षितता आदी विकास कामांच्या संदर्भात उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन पुन्हा करण्यात येणार आहे का? असा प्रश्न विचारल्यावर उदयनराजे म्हणाले की, ‘ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजन प्रसंगी जिल्ह्यातील प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधींना यांना निमंत्रण देण्यात आले होते. पण संकुचित विचार, नाकर्तेपणा यामुळे कोणी आले नाही,’ अशी टीका उदयनराजेंनी केली आहे. तसंच, ‘मंत्री असेल तर त्यांनी उद्घाटन करायचे असे कोणत्याही कायद्यात लिहलेले नाही. ते मंत्री असले तरी पहिले आमदार अथवा खासदार आहेत. मी सुद्धा खासदार आहे, त्यांच्यासारखा नाही. तर भरपूर खाज असलेला खासदार आहे. लोकांचे महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्याची की मला भरपूर खाज आहे,’ असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे.

‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी विनंती करुनही तेव्हा कोणी आले नाही. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते तेव्हा त्यावेळी तेथे स्विमिंग पूल होणार, वाहतुक कोंडी होणार, अशा वल्गना अनेक जण करत होते. कोणतेही काम करताना त्रास होत असतो. मुलं एका दिवसात होत नाहीत. मुलं होतानाही नऊ महिने त्रास सहन करावाच लागतो. मग हे ग्रेड सेपरेटरचे काम आहे. त्यामुळे त्रास होणारच. काम पूर्ण होताच सगळेजण हात पकडून कॉलर उंचावून होते. लगेच उद्घाटन करून टाकू असे म्हणत होते. मी कोणाची वाट पाहत नाही. त्यांनी म्हटले म्हणून मी उद्घाटन केले नाही. कामाची पूर्तता कधी होते याची मी वाट पाहात होतो. मंत्री असेल तर त्यांनी उद्घाटन करायचे असे कोणत्याही कायद्यात लिहलेले नाही. ते मंत्री असले तरी पहिले आमदार अथवा खासदार आहेत. मी सुद्धा खासदार आहे, त्यांच्यासारखा नाही. तर भरपूर खाज असलेला खासदार आहे. लोकांचे महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्याची की मला भरपूर खाज आहे, असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे.

‘मी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांना विचारले होते. पण करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनीच मला हे ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यास सांगितल्याचे उदयनराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘राज्यातील सर्व मंत्र्यांना बोलवा त्यांच्या हस्ते ग्रेड सेपरेटर चे उद्घाटन घ्या. जिल्हाधिकार्‍यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला बोलवावे त्यांच्या हस्ते उद्घाटन घ्या. त्यांना ही बघू द्यात की उदयनराजे यांनी मांडलेली संकल्पना योग्य आहे की नाही. कोणीतरी शाब्बासकी कौतुकाची थाप टाकली पाहिजेना.? लोकांचे कौल घेऊनच मी ग्रेड सेपरेटर चे उद्घाटन केले. बाकीचे रथी-महारथी आले असते तर तेथे भाषणे झाली असती. त्यांनी ग्रेड सेपरेटर मध्ये न जाता स्वतःचे किती योगदान आहे हे सांगितले असते. स्वप्नात ग्रेड सेपरेटर आला आणि आम्ही त्याला मान्यता दिली असेही काहीजण बोलले असते. जे भूमिपूजनासाठी वेळ काढून येऊ शकत नाहीत ते उद्घाटनालाही येणार नाहीत, हे मला माहित होते. म्हणूनच अभी के अभी उद्घाटन केले त्यांनी आता काहीही करू द्यात उद्घाटन झाले ते झालेच एकदा मूल जन्माल्यावर ते पोटात घालून पुन्हा सिझेरियन करायचे हे मला कळत नाही,’ असा टोलाही यावेळी उदयनराजे यांनी लगावला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here