वाचा:
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलानाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारकडून एकाही पत्राला उत्तर आले नाही. त्यामुळे हजारे सध्या केंद्र सकारवर भडकले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी कळविली होती. सरकार आपल्याशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप हजारे यांनी केला होता. त्यासोबतच सूडबुद्धीने वागणाऱ्या सरकारला जनता कशी घडा शिकविते, याचे जुने उदाहरणही हजारे यांनी दिले होते.
वाचा:
त्यानंतर हजारे यांनी आज पुन्हा पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये आपल्या मागण्या मांडताना सरकारवर खोटेपणाचा आरोपही केला आहे. हजारे यांनी म्हटले आहे, मागील आंदोलनाच्या वेळी आपण लेखी आश्वासन देऊन मागण्या मान्य करीत असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावर काहीही झाले नाही. मागण्या पूर्ण करायच्या नसतील तर सरकारने खोटी आश्वासने देऊ नयेत, असे आम्हाला वाटते. देश चालविणाऱ्या सरकारने सत्तेसाठी खोटे बोलणे योग्य नाही. त्याचा जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो. जी गोष्ट सरकार करू शकत नाही, ती त्यांनी स्पष्ट सांगितली पाहिजे. तसे झाले तर मागणी करणारे विषय सोडून देतील. पण सरकार जेव्हा अडचणीत येते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी खोटी आश्वासने देते. आपण आपल्या जीवनात कधीही खोटे बोललो नाही. त्यामुळे सरकारचा हा वेळकाढूपणा आणि खोटे बोलण्याचा त्रास होतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत सरकार असेच आपल्याशी वारंवार खोटे बोलत आहे. या प्रश्नांत लक्ष घालण्याचे आश्वासन सरकारने दिले असले तरी त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. भाव पडले म्हणून दूध आणि शेतीमाल रस्त्यावर फेकण्याचे प्रकार सुरूच आहेत. या गोष्टी आता आपल्याला सहन होत नाहीत. मी आतापर्यंत पक्षाचा विचार न करता जनतेच्या भल्यासाठी आंदोलन करीत आलो आहे. त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जीवाची बाजी लावायला तयार आहे. सत्तेसाठी आपले सरकार सत्यापासून दूर जाते, याचे वाईट वाटते, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times