मुंबईः अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत २-१नं विजय मिळवला आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तसंच, ट्विट करत अजिंक्य रहाणेचं कौतुकदेखील केलं आहे.

भारताच्या विजयानंतर यांनी एक ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ भारतीय क्रिकेट संघानं मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेंच्या यशस्वी नेतृत्वाखाली लढाऊ वृत्तीनं खेळून ऑस्ट्रेलियातील मैदानावर यजमान संघाचा पराभव करुन मिळवलेल्या विजयाबद्दल संघातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन. विजयाची घोडदौड अशीच सुरु राहो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

भारताच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या. ‘दमदार अशा विजयासाठी टीम इंडियाचं खूप अभिनंदन, ही एक ऐतिहासिक घटना आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. गाबाच्या मैदानावर ३२ वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करायला भारतीय संघानं भाग पाडलं,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here