चंदीगड:
माणुसकीला काळीमा फासणारी घटना चंदीगडमध्ये घडली आहे. एका आईने आपल्या अडीच वर्षांच्या लहानग्याचा गळा घोटला आणि त्याला पलंगाच्या बॉक्समध्ये बंद केलं. मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. आईला अटक करण्यात आली आहे. तिने आपला गुन्हाही कबूल केला आहे.

या आईचं नाव रुपा वर्मा (२५) आहे. मुलाचं नाव दिव्यांशी वर्मा आहे. हे कुटुंब मुळचं बिहारचं आहे. पोलिसांच्या तपासात आढळलं की ही महिला मुलाला मारल्यानंतर शनिवारपासून फरार होती. तिच्या पतीने पत्नी आणि मुलगा बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. या दरम्यान पतीला रविवारी फोन आला. एका अनोळखी क्रमांकाने आलेला हा फोन त्याच्या पत्नीनेच केला होता. पत्नीने पतीला सांगितलं की दिव्यांशु बेडच्या बॉक्समध्ये बंद आहे. हे ऐकताच पतीला धक्का बसला. बॉक्स उघडला तर मुलगा बेशुद्ध होता. रुग्णालयात दाखल केलं, पण त्याचा मृत्यू झाला होता.

सहा महिन्यांच्या मुलीचाही झाला होता मृत्यू

रुपा वर्मा हिची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या तपासाची दिशा आता तिच्या सहा महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूकडे वळली आहे. पाच महिन्यांपूर्वी या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पतीचा आरोप आहे की पत्नीशी त्याचा सततचा वाद होई कारण ती घरातलं काम करत नसे. तिला माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवायचं होतं, असं त्याने सांगितलं.

रुपाचा पती दशरथ हा इलेक्ट्रिशियन आहे. त्याला दारुचं व्यसनही आहे. पोलीस वेगवेगळ्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

55 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here