ब्रिस्बेन: Australia vs India भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-१ने पराभूत केले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मोठा धडा शिकवला आहे. संपूर्ण मालिकेत वेगवेगळ्या आघाडीवर संघर्ष करणाऱ्या भारताने पहिल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. भारातीय संघाकडे अनुभवाची कमतरता होती. पण ऑस्ट्रेलियाने कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की त्यांचा असा पराभव होईल.

वाचा-

भारताने ज्या ब्रिस्बेन मैदानावर विजय मिळून मालिका २-१ने खिशात घातली. त्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा ३३ वर्षानंतर पराभव झाला. भारतीय संघाचे आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक संपूर्ण जग करत आहे. अशात ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक ()ची प्रतिक्रिया आली आहे.

वाचा-

या पराभवातून आम्हाला मोठा धडा मिळाला आहे. भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक कधीच करू नये. जर तुम्ही दीड कोटी लोकसंख्येतून भारतीय संघातील ११ जणांमध्ये खेळत असाल तर तुम्ही नक्कीच दर्जेदार खेळाडू आहात. एडिलेडमध्ये आम्ही तिसऱ्या दिवशी विजय मिळवला. भारताला ३६ धावांवर बाद केले. पण त्यांनी शानदार कामबॅक केले. जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा यासारखे मोठे खेळाडू जखमी झाल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा घेता आला नाही.

वाचा-

वाचा-

चौथ्या कसोटीत भारतीय संघाला विजयासाठी ३२४ धावांची गरज होती. भारताकडून ऋषभ पंतने नाबाद ८९ धावा केल्या. भारतीय डावाचा पाया शुभमन गिलने ९१ धावा करून रचला. त्याला चेतेश्वर पुजाराने आकार दिला आणि पंतने कळस चढवला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here