‘लस तयार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. आरोग्य कर्मचारी, विशेषत: डॉक्टर आणि नर्सेस लस घेण्यास नकार देत असतील तर ही चिंता वाढवणारी बाब आहे. हा संसर्ग पुढे काय स्वरुप घेईल आणि ते किती मोठे असू शकेत हे आम्हाला माहित नाही, म्हणून कृपया लसीकरण करा’, असं आवाहन निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केली आहे. भारतात करोना लसीकरणाचा चौथा दिवस होता.
विशेष म्हणजे करोनाविरूद्ध देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पण लसीकरणासाठी अपेक्षित उत्साह अद्याप दिसून आलेला नाही. या मागचं कारण म्हणजे लस घेतल्यानंतर होणारे हे ‘किरकोळ परिणाम’ असल्याचं बोललं जातंय. लसीबद्दल नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि लसीकरण कार्यक्रमाबद्दल जागरूकता नसणं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ‘या लसीमुळे थोडी वेदना, हलका ताप, अस्वस्थता, किरकोळ त्रास अशा इतर तक्रारी येऊ शकतात. पण याची भीती बाळगण्याची गरज नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times