पुणे: नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून फेसबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकत येथील घरातून एक तरुणी बेपत्ता झाली होती. या तरुणीचा शोध घेऊन तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी ही पाहून तत्काळ तरुणीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर भरोसा सेलच्या महिला सहाय्य कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन तरुणीचा शोध घेतला व तिचे मतपरिवर्तन केल्याने मोठा अनर्थ टळला. ( )

वाचा:

तीस वर्षे वयाची सोनाली (नाव बदललेले) ही मूळची मुंबई येथील आहे पण, नोकरीसाठी ती पुण्यात आली आहे. कोथरुड परिसरात रेंटवर रूम घेऊन ती वडिलांसोबत राहते. मध्ये तिची नोकरी गेली. त्यानंतर तिला नोकरी मिळत नव्हती. यामुळे ती नैराश्यात गेली होती. या नैराश्यातूनच तिने फेसबुकवर आत्महत्या करणार असल्याबद्दल पोस्ट लिहिली. त्यानंतर ती घरातून गायब झाली होती. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांना या पोस्ट बद्दल माहिती मिळताच त्यांनी तातडीने याची दखल घेत महिला कक्षाच्या सहायक निरीक्षक यांना शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दामिनी पथकाच्या कर्मचाऱ्यांना तिच्या शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार दामिनी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

वाचा:

फेसबुकवरील माहितीच्या आधारे या तरुणीचा मोबाइल क्रमांक व राहत्या घराचा पत्ता पोलिसांनी मिळवला. पण, त्या ठिकाणी सापडलेला मोबाइल क्रमांक बंद लागत होता. दामिनी पथकाच्या मार्शलने तरुणीच्या घराच्या पत्त्यावर धाव घेऊन तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आपली मुलगी सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर गेल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयाकडून तरुणीच्या मित्र-मैत्रिणींचे मोबाइल क्रमांक घेत त्यांना फोन केला. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी एका मित्राने कोथरूड परिसरात ती असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस व सदर तरुणीच्या मित्रांनी कोथरुड भागात तिचा शोध घेतला. त्यावेळी ती एका मॉलच्या बाहेर बसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिला धीर देत कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी तिचे मत परिवर्तन करण्यात आले व धीर देऊन वडिलांसोबत घरी पाठवण्यात आले. तिच्या नोकरीसाठी देखील प्रयत्न केले जातील, असा दिलासा तिला पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवून तरुणीला वाचविल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here