मुंबई: राज्यातील तीन पक्षांचं सरकार मुख्यमंत्री समर्थपणे सांभाळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची स्तुती केली. ( Jayant Patil on CM )

वाचा:

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेले दोन दिवस सर्वच आघाडीचे नेते टोलेबाजी करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना, सध्या मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थितपणे चालवत आहे. मध्ये काही खड्डे आणि अडचणी येत असल्या तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे, असे सूचक विधान केले होते. या विधानावर लगेचच विरोधी पक्षनेते यांनी टोलेबाजी केली होती. ‘उद्धव ठाकरे अत्यंत चांगल्या प्रकारे कार चालवतात हे खरं आहे पण, ते कार चालवतात तेव्हा त्यांच्यासाठी ट्रॅफिक पूर्णपणे थांबतं’, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर आज जयंत पाटील यांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

वाचा:

राज्याचं स्टेअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे आणि त्यांची गाडी व्यवस्थित सुरू आहे, असे जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वाटेत नेमके अडथळे कोणते आहेत व ते कोण आणत आहे?, असे विचारले असता अडथळे आहेत हे आम्हालाही दिसतं आहे पण, त्याने त्यांना काही फरक पडलेला नाही, असे हसतच पाटील म्हणाले.

वाचा:

अर्णब प्रकरणी सत्य समोर येऊ द्या

टीआरपी घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान जे व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे, त्याद्वारे धक्कादायक माहिती उघड झाली असून याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून झाली पाहीजे, अशी मागणी यावेळी जयंत पाटील यांनी केली. आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील संभाषण गंभीर आहे. गोस्वामी यांच्याकडे संरक्षण विषयक गोपनीय आणि इतकी संवेदनशील माहिती आली कशी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यात भाजप अर्णब यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असून याप्रकरणी सखोल चौकशी होऊन प्रत्येक गोष्टीचा खुलासा व्हायला हवा, असेही पाटील म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here