मुंबईः प्रकरणी ( ) सुप्रीम कोर्टात ( ) आजपासून सुनावणी होणार आहे. ही सुनावणी २५ जानेवारीपासून सुरू होणार होती. पण सुप्रीम कोर्टाने अलिकडेच सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुप्रीम कोर्टात यापूर्वी गेल्या महिन्यात ९ डिसेंबरला सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास नकार दिला. यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला झटका बसला. तसंच २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणावर अखेरची सुनावणी सुरू केली जाईल, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. पण आता मराठा आरक्षणावारील सुनावणी अलिकडेच म्हणजे आज बुधवारी २० जानेवारीपासून घेणार आहे.

‘राज्य सरकारने आता पूर्ण तयारीने उतरावं’

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होणार होती. पण सुप्रीम कोर्टाने २० जानेवारीपासून सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता राज्य सरकारची जबाबदारी वाढली आहे. सरकारने पूर्ण तयारीने न्यायालयीन लढाई लढावी. आम्ही तयारी केली आहे, असं मराठा मोर्चाचे समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट या न्यायमूर्तींचा या घटनापीठात समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here