म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: मैत्रीचे नाटक करत २५ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला व त्याचा व्हिडिओ तयार करुन ब्लॅकमेल करीत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. गर्भवती राहिल्यानंतर ‘तुझा निर्भया करू’ असे धमकावत जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करायला लावल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद उमर मोहम्मद जावेद याला अटक करण्यात आली.

आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (३१ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे पाटील यांनी दिले. प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या दोन्ही मामांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे व त्यांनाही शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मोहम्मद उमर मोहम्मद जावेद (२४, रा. परभणी) हा तरुणीचा दुचाकीवरुन पाठलाग करत होता. त्यानंतर तिच्याशी मैत्रीचे नाटक करुन तिला जुलै २०१९ मध्ये ज्युसमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर मोहम्मद उमरने अत्याचार केले. अत्याचार करतानाचा मोहम्मद उमरने आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ तयार केला. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिला व्हिडिओ दाखविला. हा व्हिडिओ दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, मोहम्मद उमर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here