म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यापुढे कुणी असे विधान केले तर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा देत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, यावेळी कन्नड वेदिके या संघटनेचा निषेध करण्यात आला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे पडसाद मंगळवारी सीमाभागात उमटले. कोल्हापुरात दुपारी मिरजकर तिकटी येथे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यापुढे असे विधान खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, शशी बिडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here