वाचा:
श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमासाठी पेरे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘गेल्या पंचवीस वर्षांपासून गावात काम करण्याची संधी मिळाली. पाच निवडणुका आपण लोकशाही मार्गाने लढविल्या. त्याच यश आले, त्यानुसार काम करीत राहिलो. यावर्षी मात्र आपण अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरलो नाही. कोणाचा प्रचारही केला नाही. ग्रामपंचायतीच्या आठ जागा बिनविरोध झाल्या. तीन जागांसाठी मतदान घेण्याची वेळ आली. त्यासाठी माझ्या मुलीने जेव्हा उमेदवारी अर्ज भरला, तेव्हाच तिला सांगितले की, तू तुझा निर्णय घे. मला सर्व उमेदवार सारखेच आहेत. या निवडणुकीत मी कोणाचाही प्रचार करणार नाही. त्यानुसार आपण वागलोही निवडणूक काळात आपण गावात न थांबता बाहेरच होतो. गावात आमच्या कुटुंबातील ११ मते आहे. या निवडणुकीत माझ्यासह घरातील कोणी मतदानही केले नाही. मुलीचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला आहे. यावरून निवडणुकीत नेमकी स्थिती होती, आमची काय भूमिका होती, हे लक्षात येईल. मात्र, प्रसार माध्यमांनी याकडे दुर्लक्ष करून वेगळे व चुकीचे चित्र मांडले. पंचवीस वर्षांच्या काळात गाव आणि सोबतच गावांतील लोकांचे विचार बदलू शकलो, याचे समाधान आहे. चांगले काम करून दाखविल्यानेच गावातील लोक माझ्या पाठीशी राहिले,’ असेही पेरे पाटील म्हणाले.
वाचा:
औरंगाबाद जिल्ह्यातील या गावात पेरे पाटील यांनी मोठे काम उभे केले आहे. यावेळी त्यांच्या गावात निवडणूक झाली. त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचा पराभव झाला. त्यांना निवडणुकीत १८६ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दुर्गेश खोकड यांनी २०४ मते मिळाली. मागील तीस वर्षांपासून भास्करराव पेरे यांची पाटोदा ग्रामपंचायतीवर सत्ता आहे. ग्रामविकासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळलेले आहेत. आता मात्र त्यांनी गावच्या सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे दिसून येते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times