मुंबईः ‘राज्य सरकार ज्या प्रकारे मराठा आरक्षणात घोळ घालतेय. त्यावरुन राज्य सरकारच्या मनात नेमकं काय चाललंय हेच कळत नाही. मराठा आरक्षणाची जी आत्ताची स्थिती आहे. ती केवळ राज्य सरकारच्या घोळामुळं आहे,’ अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरु होणार होती. मात्र, न्यायालयाचनं सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

‘मराठा आरक्षण केवळ सरकारच्या घोळामुळं अडचणीत आलं आहे. काही पिटीशन दाखल होतात आणि मग त्यासाठी राज्य सरकार वेळ मागत आहे. राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही. सरकार एक ठाम भूमिकाच मांडू शकत नाहीये. प्रत्येकवेळी नवीन भूमिका मांडली जाते. सरकारच्या दोन माडण्यांमध्ये मोठा फरक आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात घोळ चालला आहे. सरकारनं एक कमिटी केली आहे. ती कोणाशी चर्चा करते, ते काय निर्णय होतात ते काहीच समजत नाही. हे प्रकरण वाईट पद्धतीने हाताळण्यात येतंय,’ असा आरोपही त्यांनी केलाय.

‘राज्य सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही, कोण कोणता निर्णय घेतंय हे कोणालाच माहिती नाही. सगळ्या प्रकारच्या आरक्षणावर कुठेतरी प्रश्नचिव्ह निर्माण व्हावं अशी परिस्थिती दिसतेय. त्यातूनच एमपीएससी आणि राज्य सरकारचा घोळ निर्माण झालाय,’ अशी टीकाही त्यांनी केलीये.

भाजपचे १९ नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘भाजपमधून कोणी बाहेर जात नाहीये, भाजपमध्येच लोकं येणार आहेत,’ असा दावा त्यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here