‘नियमांप्रमाणे आणि केंद्र सरकारच्या धोरणांनुसार जर ठरवलं की मंत्र्यांनी लसीकरण घ्यावं. तर मी पहिला व्यक्ती राहिनं. मात्र, आमची वेळ ही शेवटी आहे. त्या अगोदर ज्यांनी करोना काळात काम केलं आहे त्यांना सुरक्षितता देणं जास्त गरजेचं आहे. ते आरोग्य कर्मचारी आहेत. असं केंद्र शासनाचं मत आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
‘६० वर्षांवरील जे लोक आहेत त्यांना संसर्ग झाल्यास अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळं त्यांना आधी लस देण्यात येईल. त्यानंतर बाकीचे सगळे. केंद्र सरकारच्या या सूचनांचे पालन करणं आदर्श नागरिकांचे काम आहे. मंत्र्यांनी नैतिकतेनं तसं वागणं गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही लस पहिले घेत नाहीयेत जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा आम्ही घेऊ,’ असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं आहे.
भारत बायोटेकच्या कॉव्हॅक्सीन या लसीच्या सुरक्षिततेविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात शंका आहे. यावरही राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. ‘भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूच्या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. त्यांच्याबाबत कोणताही भेदभाव करु नका. संशोधकांनीही त्याची संपूर्ण तपासणी करुन आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे.
कोव्हॅक्सिनची लस ज्यांनी घेतली आहे त्यांना कोणतीही लक्षणं जाणवली नाहीयेत. दोन्ही लसी सुरक्षित आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, लसीकरणाच्या मोहिमेकडे सगळ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावं, अशी विनंती राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times