पक्षाच्या जडणघडणीत अनेक नेत्यांचे मोठे योगदान आहे. मात्र आता काँग्रेसपासून दूर गेल्याचे चित्र आहे. या समाजाला पुन्हा काँग्रेसच्या जवळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन काँग्रेस विचार जनजागृती अभियाअंनतर्गत आयोजित चर्चासत्रात करण्यात आले. ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोकसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली ताजुद्दीन बाबा परिसर वाकी येथे अलीकडेच हे चर्चासत्र अयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नेत्यांनी हे आवाहन केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, गोपाळकृष्ण गोखले, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलजीरालाल नंदा, पंडित रविशंकर शुक्ल, डॉ. शंकरदायल शर्मा, कमलापती त्रिपाठी, नारायणदत्त तिवारी, जगन्नाथ मिश्रा, ललितनारायण मिश्रा, विठ्ठल गाडगीळ, वसंत साठे, आचार्य विनोबा भावे अशा कितीतरी ब्राह्मण नेत्यांनी काँग्रेस पक्ष बळकट केला. काँग्रेस पक्षाला एक नवी दिशा दिली. मात्र आता ब्राह्मण समाज काँग्रेसपासून का दूर जात आहे, याचा विचार झाला पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले. माजी खासदार गेव्ह आवारी, सेवादलाचे कृष्णकुमार पांडे, हुकुमचंद आमधरे, बंडोपंत टेंभुर्णे, जिजोबा पारधी, अॅड. शिरीष तिवारी, सुनील पाटील, हरीष खंडाईत, ताराचंद शर्मा, गुड्डू तिवारी यांनी यावेळी विचार मांडले. प्रास्ताविक श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक यावले यांनी केले.
प्रत्येक कार्यात सहभाग
हिंदू धर्म मानणाऱ्या प्रत्येक जातीचा ब्राह्मणांशी संबंध येत असतो. जन्मापासून तर मृत्युपर्यंत सर्व धर्मसंस्कार ब्राह्मणच पार पाडत असतात, असे यावले यांनी सांगितले. काँग्रेस आमच्यासाठी अस्पृश्य नाही. सर्वधर्मसमभाव काँग्रेसनेच जपला आहे. आता काँग्रेसनेही ब्राह्मणांना जवळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रा. अनिल शर्मा म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनवीर अहमद यांनी केले. यावेळी प्रभाकर खैधरी, आनंदसिंग ठाकूर, मनोज काळे, रामभाऊ कावडकर, सुभाष पेंडारकर, भीमराव हाडके, नाना कंगाले, सुनील ढोले, मालिनी खोब्रागडे, विनोद नाकाडे उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times