नवी दिल्ली : पुढच्या वर्षीच्या आयपीएलची जोरदार तयारी आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ करत आहे. चेन्नईने हरभजन सिंग, पीयुष चावला आणि मुरली विजय यांना संघातून रिलीज केले आहे. पण आता सुरेश रैना आणि केदार जाधवचे काय होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होता. याबाबतचा निर्णय झालेला असल्याचे आता समोर आले आहे.

चेन्नईच्या संघाचा उपकर्णधार सुरेश रैना आणि केदार जाधव यांनाही चेन्नईचा संघ सोडचिठ्ठी देऊ शकतो, असे म्हटले जात होते. कारण यावर्षी झालेल्या आयपीएलपूर्वीच रैनाने कोणाचेही न ऐकता संघाला सोडण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या संघाला दुबईमध्ये सोडून रैना मायदेशी परतला होता. त्यानंतर रैना आणि संघ मालक एन. श्रीनिवासन यांच्यामध्ये वाद विवाद झाल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यामुळे रैनाला यावेळी पुन्हा चेन्नईच्या संघात स्थान मिळणार की नाही, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नईच्या संघाने रैनाला कायम ठेवले असल्याचे समजते आहे.

केदार जाधव हा बऱ्याच कालावधीपासून चेन्नईच्या संघात आहे. यावर्षी केदारवर मोठी जबाबदारी होती. पण केदार पूर्णपणे अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळाले. कारण यावेळी झालेल्या आयपीएलमध्ये केदारला आठ सामन्यांमध्ये फक्त ६२ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे केदार हा ट्रोल झाला होता. त्यामुळे पुढच्या मोसमात केदारला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पण या दोघांना संधी द्यायची की नाही, हे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हातामध्ये असल्याचे म्हटले जात आहे. पण केदारबाबतचा अजूनही कोणता निर्णय चेन्नईच्या संघाने घेतलेला नाही.

चेन्नईच्या संघाने हरभजन सिंग, पीयुष चावला आणि मुरली विजय यांना संघातून रिलीज केले आहे. त्याचबरोबर अजून काही खेळाडूंना चेन्नईचा संघ रिलिज करणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या संघातून कोणत्या खेळाडूला रिलिज करण्यात येणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्याचबरोबर पुढच्या लिलावात चेन्नईचा संघ कोणत्या खेळाडूंना संधी देणार, याची उत्सुकताही त्यांच्या चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे सर्व चित्र स्पष्ट होईल, असे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here