वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या समारोपाच्या भाषणात मोठे संकेत दिले आहेत. आपण सुरू केलेले आंदोलन ही तर फक्त सुरुवात असल्याचे यांनी समर्थकांना सांगितले. त्यामुळे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते स्वत: एक राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांसोबत याबाबत विचारविनिमय केला आहे. मात्र, ट्रम्प याबाबत किती गंभीर आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, ते राजकारणात कायम राहणार आहेत आणि ही आंदोलनाची आता सुरुवात झाली आहे. बुधवारी नवीन प्रशासनाकडे सत्ता सोपवण्यास तयार आहे. जे आंदोलन आपण सुरू केले होते, ती फक्त सुरुवात आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांच्या नव्या पक्षाचे नाव ‘Patriot Party’ (देशभक्त पक्ष) असू शकते.

वाचा:

ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर रिपब्लिकन पक्षातील खदखद वाढली आहे. ट्रम्प यांच्यामुळे रिपब्लिकन पक्षात दोन गट तयार झाले आहेत. एका गटाकडून फुटीरतावादी भूमिकेला पाठिंबा दिला जात असून दुसऱ्या गटांकडून ट्रम्प यांच्या द्वेष पसरवणाऱ्या भूमिकेचा विरोध करत आहे. कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर हे मतभेद समोर आले. रिपब्लिकन नेते मिट मॅकॉनल यांनी ट्रम्प यांनीच आपल्या समर्थकांना उकसवले असल्याचे म्हटले. त्यांनी जमावाच्या डोक्यात खोटी माहिती भरली आणि या जमावाला अन्य शक्तिशाली लोकांनी उकसवले.

वाचा: वाचा:

ट्रम्प यांच्यानंतर मिट मॅकॉनल हे रिपब्लिकन पक्षाचे सर्वात वरिष्ठ नेते असणार आहे. त्यांनीच ट्रम्प यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाचेही त्यांनी खासगीत समर्थन केले असल्याचे म्हटले जाते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here