आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत गेल्या नऊ महिन्यांपासून थैमान घातलं होतं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून धारावीतली करोना संसर्ग अटोक्यात येत आहे. जिथं दिवसाला हजारोंच्या घरात रुग्ण सापडत होते तिथं आता ही संख्या बरीच खाली आली आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येत आहे. दाटीवाटीचे भाग व झोपडपट्ट्यांमुळे करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याच भागात आता रुग्ण घटत आहेत. तसंच, गेल्या काही दिवसांत धारावीत एकाही रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला नाहीये. ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
धारावीत आज ३ रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ९०० इतकी झाली झाली असून सध्या फक्त १५ रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर, आत्तापर्यंत ३ हजार ५७३ इतक्या जणांनी करोनावर मात केली आहे. धारावीला लागून असलेल्या दादरमध्ये आज ३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं दादरमधील एकूण रुग्णसंख्या ४ हजार ८९८ इतकी झाली असून ४ हजार ६३२ इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर दादरमध्ये सध्या फक्त ९३ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times