मुंबई: वेबसीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांसाठी उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाईसाठी लखनऊ येथून पोलीस मुंबईत दाखल झाले असतानाच या वेबसीरिजचे दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक यांना हायकोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. ( Latest Update )

वाचा:

तांडव वेबसीरिजचे दिग्दर्शक , निर्माता हिमांशु मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि अॅमेझॉन प्राइमच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित या चौघांनाही आज मुंबई हायकोर्टाने तीन आठवड्यांपुरता अंतरिम दिलासा दिला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये झालेल्या एफआयआरच्या प्रकरणात स्थानिक न्यायालयात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा यासाठी हायकोर्टाने तीन आठवड्यांपुरते या सर्वांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे मुंबईत दाखल झालेल्या उत्तर प्रदेश पोलिसांना तूर्त अटकेची कारवाई करता येणार नाही, हेसुद्धा स्पष्ट झाले आहे.

वाचा:

आम्हाला हा वाद वाढवायचा नाही!
‘ ’मधील कथित आक्षेपार्ह दृश्य हे आम्ही हटवले आहे. ते आक्षेपार्ह आहे, असे मान्य करून नव्हे पण आम्हाला हा वाद पुढे वाढू द्यायची इच्छा नाही म्हणून ते हटवले आहे, अशी माहिती अर्जदारांतर्फे ज्येष्ठ वकील यांनी आज न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर दिली. त्यावर आरोपींनी इथे उच्च न्यायालयात असा अर्ज करण्याऐवजी उत्तर प्रदेशात लखनऊमधील हजरतगंज न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करायला हवा, असे म्हणत सरकारी वकील योगेश नाखवा यांनी दिलासा देण्यास विरोध दर्शवला. त्यावर पोंडा यांनी म्हणणे मांडले. लखनऊमध्ये १७ जानेवारी रोजी रात्री ११.४५ वाजता एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर लखनऊ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अटकेची कारवाई करण्यासाठी मुंबईत येण्यास निघाले आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली. म्हणून आम्ही तातडीने उच्च न्यायालयात हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे, असे आबाद पोंडा यांनी सांगितले. त्यानंतर या प्राथमिक सुनावणीअंती न्या. प्रकाश नाईक यांनी चौघांनाही तीन आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिले.

वाचा:

दरम्यान, तांडव वेबसीरिजमधील दृष्यांवर भाजपचे आमदार यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनीही यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप असायला हवी, अशी प्रमुख मागणी या पत्रात कोटक यांनी केलेली आहे. या वेबसीरिजवरून सोशल माध्यमातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here