सध्या १२ वी परीक्षा देणाऱ्या किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (साडेअठरा वर्षे वयापर्यंतच्या) अर्थात एनडीएमध्ये प्रवेशाची संधी आहे. पुण्याजवळील एनडीए ही तिन्ही दलांमधील अधिकारी प्रशिक्षणाची जगातील एकमेव संयुक्त संस्था आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक असलेली ही परीक्षा यूपीएससीमार्फत ९ एप्रिलला घेतली जात आहे. त्यासाठी आज, २८ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. १२वी नंतर थेट नौदलात जाण्यासाठी केरळमधील एझिमला येथील नौदल अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. एनडीएसोबतच या अकादमीची परीक्षादेखील होणार आहे. उमेदवारांना त्याचे अर्जही भरता येतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here