मुंबई- यांच्या आगामी ” सिनेमाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक आणि त्याच्या सहाय्यक दिग्दर्शकामध्ये मोठं भांडण झाल्याचं बोललं जात आहे. हे भांडण एवढं वाढलं की एका सहाय्यक दिग्दर्शकाने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या कानशिलात लगावली. त्यानंतर संपूर्ण दिवसाचं चित्रीकरण रद्द करावं लागलं. पण आता याबाबतची एक दुसरी बाजू समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दिग्दर्शक सिद्धार्थ आणि त्याचा सहाय्यक दिग्दर्शक यांच्यात भांडणच झालं नाही. यासंबंधी आलेल्या बातम्यांमध्ये फारसं तथ्य नाही. सिद्धार्थ आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये अनेक वर्षांचं चांगलं नातं आहे. सिद्धार्थ सर्वांशी मोठ्या भावाप्रमाणे राहतो. त्याचं झालं असं की, सेटवर एका लाइटमनला एक दुखापत झाली. पण नंतर तो कामावर परतला.’

‘त्याला बसलेला मार गंभीर स्वरुपाचा नव्हता. मात्र ज्युनिअर आर्टीस्टने झाल्याप्रकाराचा व्हिडीओ काढला. झालेल्या घटनेपेक्षा जास्त रंगवून तो शेअर करण्याचा त्याचा मानस होता. सिद्धार्थने असं करण्यापासून त्या कलाकाराला रोखलं. मात्र तरीही तो कलाकार शांत न बसल्याने सिद्धार्थ रागावला. त्या कलाकाराचा फोन सिद्धार्थने स्वतःच्या ताब्यात घेतला तसंच त्याला सेटवरून जाण्यास सांगितलं.’

‘या सर्व प्रकाराने ज्युनिअर आर्टीस्ट भडकला आणि आक्रमक झाला. यानंतर सेटवरच्या सिक्युरिटीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. सेटवर कोणीही कोणाच्या अंगावर धावून जाणं खपवून घेतलं जात नाही. तसेच कोणीही कोणाच्या कानशिलात लगावली नाही. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.’

काय होतं आधीचं प्रकरण

चित्रीकरणावेळी कोणीही फोनचा वापर करू नये अशी सिद्धार्थने सक्त ताकीद होती. पण सहाय्यकाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर सिद्धार्थ आणि सहाय्यकामध्ये जोरदार वाद झाला. सहाय्यक सिद्धार्थला बरं- वाईट बोलू लागला. ही गोष्ट सिद्धार्थला कळताच तो सहाय्यकाकडे गेला आणि त्याच्या कानशिलात लगावली. यानंतर सहाय्यकानेही सिद्धार्थला प्रत्युत्तर देत कानाखाली मारली. यानंतर सेटवर बराच गोंधळ उडाला आणि दिवसाचं शूटिंग रद्द करण्यात आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here