वाचा:
पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची कामठीतील अलिकडच्या काळीतील ही दुसरी घटना आहे. या हल्ल्यात , व सुधीर कनोजिया हे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
वाचा:
रमानगरमध्ये रात्री १०.३० वाजताच्या सुमारास डीजे सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने नवीन कामठी पोलिसांना दिली. माहिती मिळताच शिपाई राष्ट्रपाल मारेश्वर दुपारे, राजेंद्र टाकळीकर, उपेंद्र यादव आणि सुधीर कनोजिया तेथे गेले. त्यांनी चालकाला डिजे बंद करायला लावला. त्यामुळे आकाश राष्ट्रपाल देशपांडे, बादल सिद्धार्थ देशभ्रतार, चंद्रशेखर फुले, सुनिता देशपांडे, श्रद्धा ऊर्फ पूजा देशपांडे, प्रियंका देशभ्रतार, दीपमाला वासनिक, काजल शर्मा, संजीवनी फुले व डिजेचालक अभिनव वाहने संतापले. त्यांनी पोलीस पथकावर दगड व विटांनी हल्ला केला. एका महिलेने पोलिसांना चावाही घेतला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. पोलिसांवर हल्ला झाल्याचे कळताच नवीन कामठी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला व जखमी पोलिसांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आकाश देशपांडे, बादल देशभ्रतार व चंद्रशेखर फुले या तिघांना अटक केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times