वाचा:
उद्घाटन समारंभ शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता होणार असून, त्यानंतर सकाळी दहा वाजल्यानंतर ऑनलाइन लॉटरी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत ‘ म्हाडा ’च्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी म्हणाले, ‘ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावर राखून लॉटरी जाहीर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याचे वेबकास्टिंग केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नेहरू मेमोरियल हॉल येथे गर्दी करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांना घरबसल्या निकाल पाहता येणार आहे.’
वाचा:
‘विजेत्यांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे. तसेच ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावरही निकाल पाहण्याची सुविधा असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉटरी जाहीर होणाऱ्या ठिकाणी न येता घरबसल्या निकाल पहावा’ असे आवाहनही माने पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील पाच हजार ६४७ सदनिकांसाठी ९० हजार नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाच हजार २१७ सदनिका आहेत. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ‘म्हाडा’कडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
वाचा:
यू ट्यूब लिंकवर पाहा निकाल
नागरिकांना घरबसल्या निकाल पाहता येण्यासाठी ‘म्हाडा’कडून व्यवस्था करण्यात आली आहे. http://bit.ly/PuneLottery2021 या यू ट्यूब लिंकवर नागरिकांना निकाल पाहता येणार आहे. तसेच ‘म्हाडा’च्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर निकाल उपलब्ध असणार आहे, असे मुख्य अधिकारी माने पाटील यांनी नमूद केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times