नवी दिल्लीः अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून ( ) यांनी पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांना जगभरातील प्रमुख नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांनीही ट्विट करत बायडन यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल जो बिडेन यांचे मनापासून अभिनंदन. भारत-अमेरिका सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर काम करण्याची अपेक्षा करतो, असं पंतप्रधान मोदी ट्विटमध्ये म्हणाले.

अमेरिकेतील नवीन सरकारने अलिकडच्या वर्षांत भारताशी संरक्षण सहकार्य सुधारण्यासाठी घेतलेली पावलं आगामी काळात आणखी दृढ करण्यात येतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी नवीन प्रशासनाची सूत्रे हाती घेण्याच्या एक दिवस आधीच यासंबंधी संकेत दिले. सिनेट सदस्यांसमोर झालेल्या सुनावणीत अमेरिकन सरकारच्या नव्या संरक्षण धोरणाबद्दल ते बोलत होते.

विस्तृत पातळीवर विचार करता भारताबरोबर संरक्षण संबंध आणखी बळकट केले जातील. प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून भारत आणखी मजबूत होईल. दोन्ही देशांची विद्यमान संरक्षण भागीदारी सामायिक हितसंबंधांच्या बाबतीत पुढील सहकार्य त्यांच्यासह सुनिश्चित केली जाईल. तसेच, क्वाड सुरक्षा संवाद अंतर्गत संरक्षण सहकार्य आणखी दृढ केले जाईल, असं अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here