वॉशिंग्टन: आजचा दिवस हा अमेरिकेचा दिवस असून नवा इतिहास घडत असल्याचे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले. अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाठिंबा देणाऱ्यांचेही आभार मानताना आपल्याला विरोध करणाऱ्या नागरिकांसाठी काम करणार असून मी सर्व अमेरिकन नागरिकांचा असल्याचे त्यांनी म्हटले.

बायडन यांनी आपल्या पहिल्याच भाषणात अमेरिकेतील नागरिकांना एकतेचे आवाहन केले. अमेरिकन नागरिकांमध्ये एकता नसेल तर शांतता नसणार. त्याऐवजी फक्त कटुता आणि द्वेष असेल. प्रगतीचा मार्ग नसणार, देशही नसणार फक्त अराजकता माजेल असेही बायडन यांनी म्हटले. संकट आणि आव्हानांचा हा ऐतिहासिक क्षण आहे. एकता अबाधित ठेवून आपण विजयी होऊ शकतो. एकमेकांचा आदर करणे, एकमेकांना साथ दिल्यास हे आव्हाने परतवून लावू शकू असेही त्यांनी म्हटले. कोणतीही परिस्थिती बदलू शकत नाही असे काहीजण म्हणतात. मात्र, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनी “I have a dream” म्हटलं. तर, महिलांनी मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष केला. आज अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी महिला आहे. त्यामुळे बदल होऊ शकत नाही असे म्हणू नका असे बायडन यांनी म्हटले.

वाचा:

जो बायडन यांनी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. हिंसाचाराच्या सावटाखाली पार पडलेल्या हा शपथविधी कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडला. जो बायडन यांच्यासह कमला हॅरीस यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

वाचा:

५९ व्या अध्यक्षीय शपथविधीची जोरदार तयारी करण्यात आली होती. ‘अमेरिका युनायटेड’अशी या कार्यक्रमाची संकल्पना ठेवण्यात आली होती. हा मुद्दा घेऊन बायडेन आणि हॅरिस यांनी सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. यंदा मात्र करोना विषाणूच्या साथीचे आणि अलीकडेच कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसाचाराचे त्यावर सावट आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी नेहमीसारखी प्रचंड गर्दी नव्हती. केवळ एक हजार जणांनाच या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तर, जवळपास २५ हजाराहून अधिक जवान तैनात करण्यात आले होते.

अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी जो बायडन यांना पद आणि गोपीयनेची शपथ दिली. तर, कमला हॅरीस यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश सोनिया सोटोमेअर यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ दिली. शपथविधीच्या आधी प्रख्यात गायिका लेडी गागाने अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here