वाचा:
अभिनेता याच्या आत्महत्येनंतर हिने जावेद अख्तर यांना या प्रकरणात ओढत गंभीर विधानं केली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने ही विधानं केली होती. यावर हरकत घेत अख्तर यांनी डिसेंबर २०२० मध्ये येथे कंगनाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. कोर्टाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जुहू पोलिसांना दिले होते तसेच १६ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते. दरम्यान, १६ जानेवारी रोजी सुनावणी झाली असता पोलिसांनी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. ही मुदतवाढ देताना चौकशी करून १ फेब्रुवारी रोजी अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
वाचा:
अंधेरी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांच्या पुढील कारवाईला वेग आला असून त्याचाच भाग म्हणून पोलिसांनी कंगना राणावतला समन्स बजावले आहे. शुक्रवार दि. २२ जानेवारी रोजी चौकशीसाठी पोलिसांसमक्ष हजर राहावे, असे या समन्समध्ये बजावण्यात आले आहे.
वाचा:
दरम्यान, कंगना विरुद्ध मुंबईतील हे काही एकमेव प्रकरण नाही. याशिवाय आणखीही गुन्हे तिच्याविरुद्ध दाखल आहेत. वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना व तिच्या बहिणीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याच महिन्यात पोलिसांकडून कंगनाचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आपल्याला जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप कंगनाने केला होता. ‘मी देशातील जनतेसाठी आवाज उठवत होती. त्यामुळे आता जनतेने मला साथ द्यायला हवी. माझं घर तोडलं गेलं असताना माझ्याविरुद्ध नाहक खटले भरण्यात आले आहेत. माझ्या हसण्यावरही गुन्हा दाखल केला जात आहे, असा दावा करत कंगनाने आपली बाजू समाजमाध्यमांत मांडण्याचा प्रयत्न केला होता.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times