वृत्तसंस्था, नवी दिल्ली

येत्या काही दिवसांत मोबाइल फोनचे चार्जर, औद्योगिक रसायने, दिवे, लाकडी फर्निचर, मेणबत्ती, दागिने आणि हस्तकामाच्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. कारण, येत्या एक फेब्रुवारीला सादर होणार होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार जवळपास पन्नास वस्तूंवरील वाढविण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पन्नास वस्तूंवरील आयात शुल्क वाढवून केंद्र सरकार जवळपास ५६ अब्ज डॉलरची आयात घटविण्याची तयारी करीत आहे. आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये बहुसंख्य चिनी मालाचा समावेश आहे. आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय झाल्यास चिनी बनावटीचे स्मार्टफोनही महागण्याची शक्यता आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे स्मार्टफोन, मोबाइल चार्जर आदी सुटे भाग चीनहून आयात केले जातात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनहून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर ५ ते १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. या माध्यमातून आयात होणाऱ्या वस्तूंवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जेणेकरून सर्व उत्पादनांची निर्मिती ‘मेक इन इंडिया’अंतर्गत देशांतर्गत बाजारपेठेतच करणे शक्य होईल.

‘बॅट’ लावण्याची विनंती

केंद्रातील मोदी सरकारने २०१४पासूनच स्थानिक उत्पादनात तेजी आणण्यासाठी विविध उपाययोजन करण्यास सुरुवात केली आहे. अनावश्यक वस्तूंवरील आयात शुल्क वाढविण्यात येत आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक करण्यासाठी आणि उत्पादनांची निर्मिती करण्यासाठीही प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी विदेशी उत्पादनांवर बॉर्डर अॅडजस्टमेंट टॅक्स अर्थात ‘बॅट’ लागू करण्याची विनंती वाणिज्य मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. प्रामुख्याने आयात करण्यात येणाऱ्या मालावर ‘बॅट’ची आकारणी केली जाते. जेणेकरून हा माल बाजारपेठेत खपवला जाऊ नये आणि स्थानिक उत्पादकांशी योग्य ती स्पर्धा निर्माण होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here