बायडन यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर १५ कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. हे आदेश म्हणजे ट्रम्प यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई असल्याचे बायडन यांच्या टीमकडून सांगण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडणार होती. आता ती प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान बायडन यांनी सत्तेत आल्यानंतर पॅरीस करारात पुन्हा सहभागी होणार असल्याचे म्हटले होते.
वाचा:
अमेरिकेत वेगाने फैलावणाऱ्या करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी बायडन काही आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार अमेरिकेत मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढील १०० दिवसांसाठी हा नियम असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना प्रवास बंदी जारी केली होती. बायडन यांनी ही बंदी हटवली आहे. त्याशिवाय मेक्सिको सीमेवर उभारण्यात येत असलेल्या भिंतीचे काम थांबवण्याचे आदेश बायडन यांनी दिले आहेत. मेक्सिकोनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
वाचा:
वाचा:
दरम्यान, जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात वर्णद्वेष आणि कटुता निर्माण करणाऱ्या मानसिकतेला पराभूत करण्याच्या लढाईत अमेरिकन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. आज आपण एका उमेदवाराच्या विजयाच्या जल्लोष करत नसून लोकशाहीचा उद्देश्य आणि लोकशाहीचा विजय साजरा करत असल्याचे म्हटले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times