वॉशिंग्टन: अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेताच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यांनी पहिल्याच दिवशी मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक आदेशांना रद्द बातल केले आहे. बायडन यांनी स्थलांतरीत नागरिकांना दिलासा देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे जवळपास पाच लाख भारतीयांना दिलासा मिळणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र २०१६मध्ये स्थलांतरितांना रोखण्याची घोषणा केली होती. त्यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यशही आले होते. अशा स्थितीत बायडन यांनी या धोरणात ऐतिहासिक बदल केला आहे. बायडन यांच्या निर्णयामुळे बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना नागरिकत्व देण्याचे हे सर्वांत मोठे पाऊल असणार आहे. याआधी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी १९८६मध्ये बेकायदा राहणाऱ्या तीस लाख नागरिकांना अभय दिले होते.

वाचा:

एक कोटी बेकायदेशीर स्थलांतरीतांना मिळणार हक्क

बायडन यांनी सत्तेची सूत्रे हाती घेण्याआधीच या विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. या विधेयकानुसार, एक जानेवारी २०२१ पर्यंत अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्यात येणार आहे. काही निकष पूर्ण करत असतील तर या नागरिकांना पाच वर्षांसाठी कायदेशीर मान्यता मिळेल, अथवा ग्रीन कार्ड देण्यात येणार आहे.

वाचा: वाचा:

दरम्यान, अमेरिकेत वेगाने फैलावणाऱ्या करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी बायडन काही आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार अमेरिकेत मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढील १०० दिवसांसाठी हा नियम असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना प्रवास बंदी जारी केली होती. बायडन यांनी ही बंदी हटवली आहे. त्याशिवाय मेक्सिको सीमेवर उभारण्यात येत असलेल्या भिंतीचे काम थांबवण्याचे आदेश बायडन यांनी दिले आहेत. मेक्सिकोनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here