मुंबईः बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी सोनू सूदला न्यायालयानं दणका दिला आहे. मुंबई महापालिकेनं बजावलेल्या पाडकामाच्या नोटीसला सोनूनं अपिलद्वारे आव्हान दिलं होतं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली असून महापालिकेनं केलेली कारवाई योग्य असल्याचं स्पष्ट करत न्यायालयाचं अपिल आणि याचिका फेटाळली आहे.

अभिनेता सोनू सूदने जूहूमधील आपल्या मालकीच्या शक्तिसागर इमारतीत बेकायदा बदल व बांधकामे करुन हॉटेल – लॉजिंग सुरु केल्यानं मुंबई महापालिकेनं सोनूला नोटिस बजावली होती. सोनू सूदनं पालिकेच्या नोटिसीला अव्हान देत हायकोर्टात धाव घेतली होत. परंतु, आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं सोनू सूदची याचिका फेटाळली आहे. त्यामुळं सोनूच्या इमारतीतील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा मुंबई महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोनूच्या अर्जावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. कायदा हा फक्त प्रामाणिक, मेहनती व कर्तव्यदक्ष व्यक्तींच्या मदतीला येतो. या प्रकरणात तसे दिसत नाही. त्यामुळे अपिलकर्त्याला कोणताही दिलासा देऊ शकत नाही. आता चेंडू मुंबई महापालिकेच्या कोर्टात आहे, असे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निरीक्षण नोंदवले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पालिकेनं नोटीस बजावताना आवश्यक मुदत आणि सर्व तपशील दिला जातो, मात्र माझ्याच बाबतीत पालिकेने भेदभाव केला असून काही तपशीलच दिला नाही, असा दावा केला होता.

तसंच, शक्तीसागर इमारत ही १९९२पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २०१८-१९मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा १९९२पासून तोडण्यात आलेली नाही, असंही सोनू सूदनं न्यायालयात म्हणणं मांडलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here