मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी अलीकडेच मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटलांनी व्यक्त केलेल्या या इच्छेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री यांनी एक सुचक वक्तव्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना वाढीव वीज बील, मराठा आरक्षण तसंच, भाजप नगरसेवकांचं पक्षांतर याबद्दल चर्चा केली. त्याचदरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी जयंत पाटलांनी जी काही इच्छा प्रदर्शित केली आहे त्याला मी पाठिंबा देतो, असं सूचक वक्तव्य केलं आहे. अजितदादांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच, राजकारणात आता पुन्हा नवीन वादळ येणार का?, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपच्या १९ नगरसेवकांचं सत्तांतर
भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. अजित पवारांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले असून सध्या पक्षांतर बंदी कायदा आहे. पक्ष सोडल्यास त्यांचं नगरसेवक पद रद्द होईल. भाजपचच्या नगरसेवकांचं पक्षांतर ही ऐकीव माहिती आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रियी दिली आहे. एक मंत्री मोठे निर्णय घेत नसतो. संपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेत असतो. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची तिजोरी पाहता सगळ्या गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. करोना आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

जयंत पाटील काय म्हणाले होते.

एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. ‘आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल, असं जयंत पाटील म्हणाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here