. टा. प्रतिनिधी, पिंपरी

गॅस कटर वापरून एटीएम कापून आठ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार दत्तमंदिर रस्त्यावर सोमवारी (२७ जानेवारी) सकाळी उघडकीस आला आहे. मशिन कापताना गॅस कटरमुळे आग लागल्याने आठ लाखांपैकी काही रक्कम जळाल्याचे दिसून येत आहे. परंतु, या नोटांची राख झाल्याने नेमक्या किती नोटा चोरल्या आणि किती जळाल्या याचा अंदाज बांधता येत नसल्याचे बँक अधिकारी आणि पोलिसांचे म्हणणे आहे. या मशिनमध्ये असलेले आठ लाख रुपये तेथे नसल्याचे उघडकीस आले आहे.

रविवारी रात्री चोरट्यांनी अॅक्सिस बँकेचे . सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परंतु, चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने एटीएम मशिन फोडून त्यातून रोकड चोरीचे प्रकार घडत आहेत. वाकड येथील प्रकारही पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या परिसरात घडला आहे. चाकण येथून तर चोरट्यांनी मशिनच उचकटून नेले आहे. शहरात मागील तीन ते चार महिन्यांत घडलेल्या ‘एटीएम’मधील रोकड किंवा मशिन चोरीच्या पाच घटनांपैकी एकाही घटनेचा तपास लागलेला नाही.

रात्रीची गस्त सदोष

शहरात रात्रीच्या गस्तीसाठी पोलिस ठाणे स्तरावर दुचाकीवर दोन कर्मचारी (मार्शल), निरीक्षकांच्या वाहनात एक अधिकारी व दोन कर्मचारी, तपास पथकातील दोन कर्मचारी तर सहायक आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात एक निरीक्षक व उपायुक्तांच्या कार्यक्षेत्रात एक वरिष्ठ निरीक्षक अथवा सहायक आयुक्त तसेच शहरात एक उपायुक्त संपूर्ण रात्रगस्तीवर लक्ष ठेवून असतात. शहरात रात्री एवढे सगळे पोलिस गस्त घालत असतानाही रात्री घडणाऱ्या चोरीच्या घटनांना अटकाव घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे रात्रीची गस्त सदोष आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पदक विजेते अधिकारी सुस्त

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात तीन वेळा, दोन वेळा तसेच किमान एकदा राष्ट्रपदी पोलिस पदक मिळविणारे किमान डझनावरी अधिकारी आहेत. यात आयुक्तांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यत सर्वांचाच समावेश आहे. उत्कृष्ट कामगिरी तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले आहे. मात्र, याच अधिकाऱ्यांना शहरातील गुन्हेगारी रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पदक मिळाल्यानंतर हे अधिकारी सुस्त झालेत का, असा प्रश्न सामान्यांना पडू लागला आहे.

‘एसआयटी’कडूनही अपेक्षा भंग

शहरात सातत्याने एटीएम चोरीच्या घटना घडत असल्याने आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती केली. परंतु, या ‘एसआयटी’च्या हातीही मागील तीन महिन्यांपासून कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. या पथकाने ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या आरोपींना शहरात वर्ग करून त्यांच्याकडे चौकशी केली. परंतु, त्यातूनही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे या ‘एसआयटी’कडूनही नागरिकांचा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अपेक्षाभंगच झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here