मुंबई: सांगलीतील एका मुलाखतीत जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टोलेबाजी सुरू केली आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्यानंतर आता खासदार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. ( want as CM)

वाचा:

सांगलीतील एका स्थानिक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांना मुख्यमंत्रिपदाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. ‘अनेक वर्षे काम करणाऱ्या प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मात्र, आमच्या पक्षाकडं सध्या संख्याबळ नाही. शिवाय, त्याबाबतचा अंतिम निर्णय हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतात,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावरून जयंत पाटील यांनाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. जयंत पाटील यांनी अर्थातच ही चर्चा फेटाळली आहे. ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं मी अजिबातच म्हणालो नव्हतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

जयंत पाटील यांच्या खुलाशानंतरही भाजपच्या नेत्यांची टीकाटिप्पणी सुरूच आहे. ‘आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडणं बाकी आहे,’ असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हाणला आहे. तर, सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खासदारांच्या बैठकीस उपस्थित असलेले खासदार गिरीश बापट यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पाटलांनी काय वक्तव्य केलं त्याबाबत त्यांनाच विचारायला हवं किंवा फारतर मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं. माझं मत विचाराल तर मला तिसरेच कोणीतरी मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं,’ असं बापट म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here