करोना लसीकरणामुळं सध्या चर्चा सुरु असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

>> काही कामगारांनी तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारून आपला जीव वाचवला. त्यांचे साथीदार मात्र आत अडकले

>> इमारतीत सुरु असलेल्या कामामुळं आग लागल्याची शक्यता

>> सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

>> येथे एनडीआरएफची तुकडी दाखल

>> जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सीरम इन्स्टिट्यूट येथे लागलेल्या आगीच्या ठिकाणी पाहणी केली

>> आग नियंत्रणात आली असून ६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहेः मुख्यमंत्री

>> विद्युत बिघाडामुळं आग लागल्याची प्राथमिक माहितीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती

>> सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उपस्थित

>> कुलिंग ऑपरेशनचं काम सुरु

>> सीरम इन्स्टिट्यूटमधील आग नियंत्रणात; अग्निशमन दलाच्या जवानांना यश

>> उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांकडून माहिती घेतली आहे असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

>> सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या.

>> आग लागलेल्या इमारतीत कोव्हिशिल्डच्या लसीची निर्मिती होत नसल्याचं सीरमकडून स्पष्टीकरण

>> आगीत अडकलेल्या नऊ जाणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे

>> आग आणि त्यामुळे झालेला धूर यामुळे बचावकार्यात सहकार्य करण्यासाठी एनडीआरएफ टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

>> आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या

>> दुपारी २. ३०च्या सुमारास सीरम इन्सिट्यूटमधील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here