म.टा. प्रतिनिधी, नगर: विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यामातून केलेल्या विरोधाची दखल घेत विडी उत्पादक साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले आहे. याची पूर्वीच घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष बदल आता झाला आहे. नगरच्या केडगाव येथील कंपनीत नवीन नावाच्या पॅकिंगचे अनावरण नुकतेच करण्यात आले.

साबळे वाघीरे आणि कंपनी १९३२ पासून विडी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. १९५८ पासून कंपनीने संभाजी विडी नावाने उत्पादन सुरु केले होते. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडीला नको म्हणून संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने केली होती. त्यामुळे कंपनीने अखेर नाव बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, तांत्रिक पूर्तता करण्यास बराच अवधी लागणार होता. त्यामुळे घोषणा झाली तरीही जुनेच नाव होते.

२४ डिसेंबरपासून नवा बदल अस्तित्वात आला. आता ही विडी साबळे विडी म्हणून ओळखली जाणार आहे. पुण्यात स्वारगेट येथे कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. महाराष्ट्र व आंध्रप्रदेशात या विडीचे उत्पादन केले जाते. नगर शहरात मागील ७० वर्षांपासून या कंपनी विडीचे उत्पादन सुरू आहे. नव्या नावाचे अनावरण तेथे करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक बाबू शांतय्या स्वामी, लाल बावटा विडी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती न्यालपेल्ली, इंटकचे शंकरराव मंगलारप, विनायक मच्चा उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here