मुंबईः गेल्या नऊ महिन्यांपासून करोनाचे संसर्गाचे संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रातही अजूनही काही प्रमाणात करोनाचा धोका कायम असल्याचं चित्र आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येनं आज २० लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असली तरी करोनामुक्तांचे प्रमाणही वाढत आहे.

महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या बुधवारी २० लाखांच्या उंबरठ्यावर होती . आज हा आकडा २०,००, ८७८ इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात घेण्यात आलेल्या १ कोटी ४० लाख १९ हजार १८८ चाचण्यांमधून १४.२७ टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवशी २ हजार ८८६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्या अधिक आहे. त्यामुळं राज्याला हा दिलासा कायम आहे.

आज दिवसभरात ३ हजार ९८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील आत्तापर्यंत १९ लाख ०३ हजार ४०८ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१३% एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यात २ लाख १२ हजार ०२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ९३६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या २४ तासांत ५४ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील करोना बाधितांचा एकूण आकडा आता ५० हजार ६३४ इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% इतका आहे. तर, राज्यात सध्या ४५ हजार ६२२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here