लस मानवतेसाठी वापरली जावी. अशा परिस्थितीत पाकिस्ताननेही लस ( ) मागितली तर भारताला कोणतीही हरकत नाही. चीनमध्ये ( ) तयार केलेली लस कार्य करत नसेल तर भारत चीनलाही देशातील लस देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं सरकारच्या सूत्रांनी सांगितलं.
पाकिस्तानमध्ये कोविशिल्डला मंजुरी
पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने काही दिवसांपूर्वी कोविशिल्ड लसच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. तसंच चिनी कंपनी साइनोफार्मच्या लसलाही मंजूर झाली आहे. पाकिस्तानने चिनी लसीच्या १० लाख डोसची ऑर्डर दिली आहे.
भारताने बांगलादेशला दिले लसचे २० लाख डोस
भारताने करोना लसीचे २० लाख डोस शेजारील देश बांगलादेशला मदत म्हणून पाठवले आहेत. भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी हे डोस बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. एके अब्दुल मोमीन यांच्याकडे सोपवले. भारताने लस अत्यंत महत्त्वाच्या वेळी दिली आहे. कारण देशात करोना संसर्ग वाढत आहे, असं मोमीन म्हणाले. बांगलादेशात आतापर्यंत ५,२९,६८७ रूग्ण आढळून आले आहेत.
१९७१ च्या मुक्तिसंग्रामापासून भारत बांगलादेशच्या पाठीशी उभा आहे. जगात आज साथीचे रोग पसरत असताना भारताने लस भेट म्हणून दिली आहे. हा उपक्रम भारत आणि बांगलादेशमधील खऱ्या मैत्रीचा पुरावा आहे, असं मोमीन यांनी स्पष्ट केलं. भारताकडून लस घेणारा बांगलादेश हा चौथा देश आहे.
भारतीय लसचे फारसे साइड इफेक्टचं नसल्याने जास्त मागणी
बहुतेक देशांनी भारतीय लसींची मागणी केली आहे. कारण भारतात तयार केलेली लस दिल्यावर तिचे साइड इफेक्ट कमी आहेत. या संदर्भात डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कर्ट यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं. आम्हाला ताबडतोब कोविशिल्ड लस पाहिजे. देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आम्हाला मदत करावी अशी विनंती करतो, असं रूझवेल्ट यांनी म्हटलंय. डोमिनिकन रिपब्लिकची लोकसंख्या सुमारे ७२ हजार आहे. रुझवेल्ट यांनी ७० हजार लसींची मागणी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times