वाचा:
पुण्यातील इन्स्टिट्युटला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी दुर्घटनास्थळाला भेट दिली. दुर्घटनास्थळी उपस्थित पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार चेतन तुपे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सीरम इन्स्टिट्युटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, करोना प्रतिबंधक लसीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवलेल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेली आग व आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामागारांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या.
वाचा:
आग लागलेल्या इमारतीत अंधार असल्याने रात्री तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे उद्या सकाळी संबंधित तज्ञांच्या पथकांकडून दुर्घटनेतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात येईल. त्यातून आगीचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, असे नमूद करताना सदर इन्स्टिट्युट ‘एसईझेड’ क्षेत्रात असून इन्स्टिट्युट इमारतीचे फायर ऑडिट, एनर्जी ऑडिट तसेच इतर आवश्यक तपासण्यांची पूर्तता करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी उत्तम कामगिरी केल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री हे देखील उद्या सीरम इन्स्टिट्युटला भेट देणार असल्याची माहितीही उपमख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times