वाचा:
विनायक मेटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात राज्य शासनाच्या वकिलांनी सुनावणीकरिता आमची तयारी नसल्याचे सांगितल्याचा आरोप केला आहे. हा आरोप धादांत खोटा असल्याचे सांगून सचिन सावंत यांनी मेटेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने त्याची सुनावणी ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष घ्यावी, अशी विनंती राज्य शासनाच्या वकिलांनी केली होती. या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष रूपात घ्यावी, ही केवळ राज्य शासनाची भूमिका नसून, यापूर्वी झालेल्या अनेक व्हिडिओ कॉन्फरन्सेसमध्ये मराठा समन्वयक आणि वकिलांनी देखील ही भूमिका मांडली होती. तीच भूमिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवली आहे. परंतु, आमदार विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणातील स्वारस्य केवळ राजकारण करण्यापुरते आणि भाजपच्या आपल्या बोलवित्या धन्यांना खुष करण्यापुरतेच असल्याने ते सतत धादांत खोटी, चुकीची, विसंगत, विपर्यास करणारी विधाने करीत असतात, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.
वाचा:
‘महाराष्ट्राच्या इतिहासात विनायक मेटे यांच्याइतका महाखोटारडा नेता झाला नसेल. मराठा आरक्षणाबाबत त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे आहेत. त्यांचा हेतु शुद्ध नाही, हे देखील स्पष्ट होऊ लागले आहे’, असा निशाणा साधताना ही सुनावणी प्रत्यक्ष रूपात होऊ नये, अशी आमदार मेटे यांची इच्छा आहे का? तसे असेल तर त्यांनी ते जाहीर करावे, असे आव्हानच सचिन सावंत यांनी दिले आहे. मेटे सतत सोयीनुसार भूमिका बदलत असतात. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याबाबतही त्यांनी पलटी मारली आहे. अशा पलटीमार नेत्यांचे आरोप विश्वासार्ह नसतात, याची समाजालाही पुरेपूर जाणीव आहे, असा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times